भुसावळ : मास्क लावण्याचे सांगितल्याने नाकाबंदी करणार्या पोलिसांशीच हुज्जत घालून पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ करण्यात आल्याने उरणच्या एस.टी.चालकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मास्क लावण्याचे सांगितल्याने पोलिसांशी घातली हुज्जत
तालुक्यातील कुर्हेपानाचे येथे रविवारी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकारी नाकाबंदी करीत असताना गारखेडा (ता.जामनेर) येथील रहिवासी रायगड जिल्ह्यातील उरणला येथे एस.टी.चालक असलेले शशिकांत शाळीग्राम चौधरी आणि त्यांचा मुलगा सुनील शशिकांत चौधरी हे दुचाकीवरून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना मास्क लावण्याच्या सूचना केल्या मात्र आम्ही मास्क लावणार नाही, असे पोलिसांना सांगत चौधरी यांनी घातला तसेच पोलिस कर्मचारी शिवाजी खंडारे यांची कॉलर पकडली तसेच माझी वरपर्यंत ओळख आहे, तुम्हाला कामाला लावेत, असे सांगत पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. आरोपी दुचाकीदेखील जप्त करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक फौजदार सुनील चौधरी, शिवाजी खंडारे, युनूस शेख, राजेंद्र पवार यांनी केली.