सहा महिन्यात मुक्ताईनगरातील प्रत्येक रस्त्याचे डांबरीकरण

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे ; सुलभ शौचालयाचे भूमिपूजन

मुक्ताईनगर- मुक्ताईनगर येत्या सहा महिन्यात मुक्ताईनगर शहरातील प्रत्येक रस्ता डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण झालेले असेल, अशी ग्वाही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी नगरपंचायतमार्फत उभारल्या जाणार्‍या अत्याधुनिक सुलभ शौचालयाच्या भूमिपूजनप्रसंगी दिली.

ही कामे लवकरच होणार पूर्ण
शहरात एसटी डेपोलगतचे टपरी अतिक्रमण काढून तेथे परीवहन विभागातर्फे व्यापारी संकुल उभारून त्याच अतिक्रमण धारकांना दुकाने देणे, पंतप्रधान आवास योजनेतून एक हजार 500 घरकुल, प्रवर्तन चौक ते कोथळी रस्ता 50 कोटींच्या काँक्रिटीकरण कामाला मंजुरी, 32 कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात 83 लाखाच्या स्मशानभूमी अक्का प्रस्थान सुशोभीकरण दोन अग्निशमन गाड्या भूमिगत गटारींसाठी 49 कोटी रुपयांचा प्रस्ताव, अल्पसंख्यांक शादी हॉलसाठी एक कोटी, मराठा समाज मंगल कार्यालयासाठी 35 लाख, कोथळी येथील वॉटर अ‍ॅम्युझमेंट पार्क दिवाळीपर्यंत सुरू करणे, शहरात सहा बगीचे तसेच शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी वर्षभरात राज्य शासनाच्या परवानग्या मिळविली जाईल, असेही खडसे म्हणाले. केंद्र शासनाच्या विविध योजनेतून यासाठी निधी आणला जात असून नागरीकांना दारापर्यंत सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी कर भरणे आवश्यक असल्याचे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहम्मद हूसेन खान, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, मुख्याधिकारी शाम गोसावी, स्वच्छता सभापती मस्तान कुरेशी, जिल्हा परीषद सदस्य जयपाल बोदडे, वैशाली तायडे, नगरसेविका कुंदा पाटील, नगरसेवक ललित महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे, निलेश शिरसाठ व सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.