अमळनेर : सहा लाखांच्या गांजा तस्करी प्रकरणातील पसार आरोपी विजय किसन मोहिते याला मध्यप्रदेशातून अमळनेर पोलिसांनी अटक केली.
पसार आरोपी अखेर जाळ्यात
गतवर्षी 12 जुलै रोजी अमळनेर पोलिसांनी गांजाचा मोठा साठा जप्त केला होता. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक निरीक्षक राकेशसिंग परदेशी, हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील, हेड कॉन्स्टेबल मिलिंद भामरे यांनी 12 जुलै 21 रोजी रात्री नऊ वाजता गस्त घालताना धरणगावकडून सावखेड्याकडे येणारा सतीश बापू चौधरी हा दुचाकीवरुन (एम.एच. 19-5730) टेहळणी करताना आढळला होता. पोलिसांनी त्याला अडवल्यानंतर त्याच्या मागोमाग चालक आकाश रमेश इंगळे चालवत असलेल्या चारचाकी (एम.एच.01 बी.टी.509) ला देखील पोलिसांनी अडवले. तपासणीत गाडीच्या डिक्कीत 20 पाकिटात 39 किलो 500 ग्रॅम सहा लाखांचा गांजा आढळला. हा गांजा कासोदा येथील शकील खान अय्युबखाँ याच्या मालकीचा होता. त्याच्यासोबत एरंडोल येथील रहिवासी विजय किसन मोहिते याचादखील या प्रकरणात समावेश असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले होते. पोलिसांनी आकाश, शकील आणि सतीश यांना अटक करण्यात आली मात्र विजय मोहिते हा गेल्या 9 महिन्यांपासून फरार होता. दरम्यान, पोलिस निरीक्षक हिरे यांना विजय किसन मोहिते हा मध्यप्रदेशातील इंदूर येथे असल्याची माहिती मिळताच त्यांनी कारवाईच्या सूचना केलय व पथकाने विजय मोहिते याला बेड्या ठोकल्या.