सहा वर्षांच्या मुलीवर धावत्या बसमध्ये अत्याचार

0

मुंबई : लहान मूली व माहिलांवर लैगिक अत्याचार विनयभंग होण्याचे प्रकारामध्ये वाढ होत आहे. शिर्डीवरुन मुंबईला परतणाऱ्या दाम्पत्याच्या सहा वर्षांच्या मुलीवर ३२ वर्षांच्या नराधमाने धावत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सोपान उगले याला अटक केली असून खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये ही घटना घडली आहे. सोपान उगले हा बेस्टमध्ये चालक म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे.

आरोपी बेस्टमध्ये चालक

मुंबईतील मालाडमध्ये राहणारे दाम्पत्य त्यांच्या दोन लहान मुलांसह तीन दिवसांपूर्वी शिर्डीला गेले होते. लक्झरी बसमध्ये १३ जूनला संगमनेरमधून सोपान उगले बसमध्ये चढला. बसमध्ये सोपान उगले हा शेवटच्या आसनावर बसला होता. त्याचवेळी सोपानच्या बाजूला गेल्यावर पीडित मुलगी झोपून गेली. यानंतर सोपानने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर येत आहे. बसमधून उतरल्यावर पीडित मुलीने तिला वेदना होत असल्याचे आईला सांगितले. यानंतर महिलेला मुलीसोबत घडलेला प्रकार लक्षात आल्यावर कुरार पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.