सहा वर्षांपासून पसार आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Jailed For Six Years in Fraud Case : Jalgaon Crime Branch Action चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसात फसवणुकीच्या गुन्ह्यात तब्बल सहा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेने प्रिंप्रीहाट-कोळगाव बसस्थानकातून सोमवारी अटक केली आहे. भगवान भिकन ऊर्फ भिका सोनवणे (34, मूळ रा.पिंप्रीहाट, ता.भडगाव, ह.मू.महादेव डिंडेली, ता.उधना, गुजरात) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सहा वर्षांपासून आरोपी देत होता गुंगारा
चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात संशयीत भगवान भिकन ऊर्फ भिका सोनवणे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता मात्र तो पोलिसांना गुंगारा देत गुजरात राज्यात पसार झाल्याने त्यास अटक करताना अडचणी येत होत्या. संशयीत 17 रोजी पिंप्रीहाट-कोळगावात येत असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कीसन नजनपाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. आरोपी सोमवारी बसमधून उतरताच त्यास अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, हवालदार सुनील पंडीत दामोदरे, हवालदार लक्ष्मण अरुण पाटील, रणजीत अशोक जाधव, किशोर ममराज राठोड, विनोद सुभाष पाटील, चालक प्रमोद ठाकुर यांच्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकत चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.