चाळीसगाव : सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्गसंवर्धनाचे काम करणार्या संघटनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर धारातीर्थ अभियान मोहिमेंतर्गत शिवकाळामध्ये युद्धभूमिमध्ये धारातीर्थ पडलेल्या विरमावळ्यांना अभिवादन करण्यासाठी दि.1 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर मोहिम राबवण्यात आली असून यात महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवर असलेल्या मावळ्यांच्या समाधीस्थळावर जावून प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तेथे साफसफाई करुन समाधींची पूजा करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित कार्यकर्ते
या मोहिमेत चाळीसगावच्या कार्यकर्त्यांनी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे व जिल्हासंपर्क प्रमुख शुभम चव्हाण यांच्या बरोबर महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला साल्हेरगड येथे जावून तेथील नरविर सुर्याजी काकडे यांच्या समाधीवर फुल पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देवून अभिवादन केले. या मोहिमेत शरद पाटील, अजय जोशी, रविंद्र सुर्यवंशी, आरिफ खाटीक, पप्पु राजपूत, विजय पांगारे, संजय गायकवाड यांच्यासह बालशिलेदार जय पाटील, सचिन घोरपडे, प्रणव कुडे, ओम गायकवाड, सचिन देवरे यांनी देखील विशेष सहभाग घेतला. साल्हेर किल्ला हा समुद्र सपाटीपासून 5 हजार 141 फुट इतका उंच असल्याने अत्यंत कठिण चढाई पार करुन ही मोहिम फत्ते करण्यात आली.