पुणे । लता-आशा-उषा असा त्रिवेणी संगम ‘साँचा नाम तेरा’ या संगीतमय मैफिलीत रसिकांना अनुभवता आला. मनीषा लताड, राधा मंगेशकर, मंजुश्री ओक यांनी विविध गीते यावेळी सादर केली. मनीषा लताड निर्मित व गंगाधर एन्टरटेन्मेंट-महक प्रस्तुत ‘साँचा नाम तेरा’ संगीतमय मैफल बालगंधर्व रंगमंदिरात नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
लता, आशा व उषा मंगेशकर यांच्या निवडक गाण्यांची मेजवानी यावेळी रसिकांना अनुभवली. लताड यांनी ‘मै तो आरती उतारू रे, मेरे मेहबूब मे क्या नही, मेरी सांसो को जो, ये आज कल के लडके’ अशी एकसे बढकर एक गाणी सादर केली. तर राधा मंगेशकर यांनी ‘इक प्यार का नगमा है, रंगीला रे, बंगले के पीछे, अपलम चपलम, लग जा लगे’ तर मंजुश्री ओक यांनी ‘आगे भी जाने न तू, रात अकेली है, दिल चीज क्या है, ओ पल हारे’ अशी गीते सादर केली. अनेक गीतांना रसिकांची ‘वन्स ओर’ची दाद मिळाली निवेदन संदीप कोकीळ यांनी, तर संगीत संयोजन विवेक परांजपे यांनी केले होते.