सांगवीत अनैतिक संबंधातून एकाचा खून, संशयीत ताब्यात

0

पिंपरी-चिंचवड : सांगवी येथील समर्थ नगर येथे एका भाड्याच्या घरात सोमवारी सकाळी दहा वाजता एका तरुण व्यावसायिकाचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात आढळला. हा खुनाचा प्रकार असून अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. कैलास तौर (वय 40, रा. समर्थ नगर, नवी सांगवी, मूळ रा. गेवराई, बीड) खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कामगाराव संशय
मिळालेल्या माहितीनुसार, तौर यांचा पिंपरी येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी आपली पत्नी व मुलाला आपल्या मूळ गावी बीड जिल्ह्यातील गेवराई येथे सोडून आले होते. घरी एकटेच असलेल्या कैलास यांचा मृतदेह सकाळी दहाच्या सुमारास घरातील स्वच्छतागृहात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या फॅब्रिकेशनच्या दुकानात काम करणार्‍या कामगारांकडे चौकशी केली असता, एका कामगाराने दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आली. यामुळे पोलिसांना त्या कामगारावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.