ओम साई फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
नवी सांगवी : एप्रिल महिन्यात लागणार्या शाळांना सुट्या व लग्नसराई यामुळे परिसरातील नागरिक आपल्या गावाकडे जात असतात व याच काळात दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की शहरामध्ये घरफोड्या आणि चोर्यांच्या प्रमाणात वाढ होते. अश्या चोर्यांच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनमध्ये ‘जागते रहो’ उपक्रम सांगवीत ओम साई फाऊंडेशनच्यावतीने गेल्या 18 वर्षांपासून राबविला जात आहे. ओम साई फाऊंडेशनच्यावतीने पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवीमध्ये नागरी सुरक्षेकरिता रात्रगस्तीच्या माध्यमातून कार्य केले जाते. फाऊंडेशनच्या कार्यकर्ते रात्री 11 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत शहराच्या प्रमुख विभागांमध्ये सांगवी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सोबत गस्तीसाठी मदत करीत आहेत.
या उपक्रमाला ह्या वर्षी 16 मे रोजी सांगवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस शिपाई विनायक डोळस, पोलीस शिपाई अण्णा जाधव, पोलीस शिपाई देवकर, पोलीस शिपाई देविदास गावित, पोलीस शिपाई बनसोडे, ओम साई फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, संपर्क प्रमुख तौफिक सय्यद, निलेश मातणे, अमित कानडे, प्रसाद जंगम, राहुल कचरे, निलेश भोसले, स्वप्रिल जाधव, सुनील मराठे, शंभु जाधव प्रमुख उपस्थित होते.
साई चौक पासून फेमस चौक, क्रांती चौक, कवडे नगर चौक, मयूरीनगरी चौक, गजानन नगर चौक, गार्डन चौक, पिंपळे गुरव बस स्थानक चौक, शिवाजी चौक, रामकृष्ण मंगल कार्यलय चौक, एम एस काटे चौक, माकन चौक, गणपती चौक व इतर ठिकाणी गस्त घालण्यात आली. हा गस्त उपक्रम कार्यक्रम सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे व पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
हा उपक्रम 15 जून पर्यंत राबविण्यात येणार असून. सदरच्या उपक्रमामध्ये काम करणार्या कार्यकरत्यांना ओळखपत्र, टी-शर्ट, शिट्टी व काठी पोलसांच्यावतीने देण्यात आले आहेत. याच बरोबर आपला शेजारी ‘खरा पहारेकरी’ हा उपक्रमही राबविण्यात येत आहे.परिसरातील नागरिकानीं या उपक्रमाचे स्वागत केले असून नागरिक स्वइच्छेने यात सहभागी होत आहेत.