शहरातील हजारो तरूणांना मिळणार रोजगार
पिंपरी चिंचवड : नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (दि. 8 डिसेंबर) भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये 50 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत. सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालय येथे सकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन होईल, अशी माहिती संयोजक नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे, कुणाल थोपटे, विकास शिंदे, सागर कोकणे, सुनील काटे आदी उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचा सहभाग
या रोजगार मेळाव्यात संगणक, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, औषध, टेक्स्टाईल, बांधकाम, उत्पादन, विपणन, विक्री, सेवा, केमिकल, पेट्रो केमिकल, फायनान्स, प्रिटींग टेक्नॉलॉजी, बँकिंग क्षेत्र, तारांकीत हॉटेल, हॉस्पीटल, हाऊस किपींग, सुरक्षा, ईव्हेंट मॅनेजमेंट आदी क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. यामध्ये इन्फोसीस, टेक महिंद्रा, जस्ट डायल, डब्लू.एन.एस, बी.वी.जी इंडिया, टाटा उद्योग समूहातील कंपन्या सहभागी होणार असून मेळाव्यातून 3000 पेक्षा जास्त बेरोजगांराना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
नाव नोंदविण्याचे आवाहन…
मेळाव्यात मोफत प्रवेश असून दहावी पासून ते पोस्ट ग्रॅज्यूएट पर्यंत त्याचबरोबर आय टी आय, डिप्लोमा विविध औद्योगिक कोर्सेस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणार्या इयत्ता दहावी पासून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांनीुुु.परपरज्ञरींश.ेीस या संकेत स्थळावर आपले नाव नोंदवावे किंवा 9860001112 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.