सांगवीमध्ये अतिक्रमण कारवाई

0
सांगवी : पिंपळे सौदागर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दहा पत्रा शेडवर अतिक्रमण कारवाई केली.   महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 मधील पिंपळे सौदागर भागात अतिक्रमण विभागाने कारवाई केली. यामध्ये पूर्वा रेसिडेन्सी सोसायटी मधील चार पत्राशेड बांधकामे तसेच शुभम हाईट्स सोसायटीमधील सहा अनधिकृत बांधकाकामाचे एकूण तीन हजार 615 चौरस फुट जागेत बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली. ही कारवाई ड प्रभागाचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने दोन जेसीबी, 10 मजूर, एक इलेक्ट्रिक कटर यांच्या साहाय्याने केली. यावेळी महापालिकेचे 20 अधिकारी, 10 पोलीस कर्मचारी आणि 10 महापालिकेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.