सांगवी खुर्द येथे 36 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

A 36-year-old youth committed suicide by hanging himself at Sangvi Khurd यावल : तालुक्यातील सांगवी खुर्द गावातील घनश्याम सोपान कोळी (36) या तरुणाने शेत शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

शेतात घेतला गळफास
सांगवी खुर्द, ता.यावल येथील घनश्याम सोपान कोळी (36) यांनी अट्रावल शेतशिवारातील सुभाष चौधरी यांचे शेत बटाईने केले आहे व ते साकळी या शेतात गेले होते. या शेतालगत असलेल्या बोरीच्या झाडाला दोरीच्या साह्याने त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार मजुरांच्या निदर्शनास आला व त्यांनी धनश्याम कोळी यांच्या कुटुंबांना माहिती दिली. घटनास्थळावरून घनश्याम यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असता डॉ. शिवदास चव्हाण, डॉ.सचिन देशमुख यांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. त्यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.

मयत घनश्याम कोळी यांच्या पक्षात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. या प्रकरणी रामकृष्ण भागवत कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजीज शेख करीत आहे.