काँग्रेस, राष्ट्रवादीतर्फे गांधी पुण्यतिथी साजरी
नवी सांगवी : राहीमाई प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त जेष्ठ विचारवंत मनोहर ढोरे व शिवलिंग किनगे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अंध मुलांना भेटवस्तु देण्यात आल्या. यावेळी दत्तात्रय भोसले, जवाहर ढोरे, रविंद्र बाईत, भुषण शिंदे, शामराव ढमाले, महेश कावळे, शिवाजी मंडलिक आदी उपस्थित होते. अहिंसेच्या मार्गाने समाज्याला जिंकण्याची गरज आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीनी आज जो अहिंसेच्या मार्गाने जाईल तो नेहमीच सर्व क्षेत्रात अधिकार गाजवेल. कोणत्याही प्रकारची व्यसने न करता आपले शरीर निरोगी व प्रसन्न ठेवावे असे, मनोगत जेष्ठ विचारवंत मनोहर ढोरे यांनी व्यक्त केले.
काँग्रेस आयतर्फे पुष्पहार अर्पण!
कॉग्रेस आय पक्षाच्या दापोडी विभागाच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त राजु वाळुंजकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तानाजी काटे, चंद्रकांत काटे, भाऊसाहेब मुगूटमल, संदेश नवले, राजु काची, नरेंद्र बनसोडे, देवेंद्र सिंग यादव, सदानंद साबळे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीतर्फे आदरांजली!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोडी विभाग यांच्या वतीने राष्ट्रवादी उपाध्यक्ष शेखर काटे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सुनिल तोरणे, विवेक विधाते, श्रीकांत काटे, सागर काटे, अमोल काटे आदी उपस्थित होते.