सांगवी परिसरात विविध उपक्रमांनी महिलादिन साजरा

0

ज्येष्ठ महिलांचे केले सत्कार

नवी सांगवी : सांगवी, नवी सांगवी परिसरातील विविध मंडळे व संस्था यांच्याकडून विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. नवी सांगवी येथील कै. यशवंतराव धोंडिबा टण्णू प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू 20 मुलींना येथील ओम साई फाऊंडेेशन व सांगवी महेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थिक मदत करण्यात आली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गरजू मुलींना सावित्रीबाई फुले पालक दत्तक योजने अंतर्गत फाऊंडेेशनचे अध्यक्ष संजय मराठे, तौफिक सय्यद, गुणी बालक उपक्रमाचे चंद्रशेखर भोईटे, मुख्याध्यापिका सुनीता माळवदे आदी यावेळी उपस्थित होते. मराठे म्हणाले की, सावित्रीबाईंमुळे मुलींची शिक्षणासाठी सोय झाली. मुलींनी या अर्थिक मदतीतून प्रेरणा घेवून विविध क्षेत्रात भरारी घेवून यश संपादन करावे. कार्यक्रमांचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख उषा पोळ, संगीता फर्राटे, मंजिरी चांदेकर, माधवी गुरव, रेखा बोरसे, संगीता सोनवणे, रजनी पतंगे, देवीदास पडवळ आदिंनी केले. सुनील दरेकर यांनी सुत्रसंचलन केले.

मधूबन मित्रमंडळ
सांगवीतील मधूबन मित्रमंडळातर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजीव गांधी प्रतिष्ठानच्यावतीने पिंपळे गुरव येथील जेष्ठ आदर्श महिला सत्कार करण्यात आला. राजीव गांधी प्रतिष्ठानच्यावतीने पिंपळे गुरव येथील जेष्ठ मातांना सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. संदेशकुमार नवले, आबा खराडे, अजय तातेड उपस्थित होते.

दापोडी परिसरात आरोग्य शिबिर
प्रभाग क्र 30, दापोडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त नगरसेविका स्वाती (माई) चंद्रकांत काटे व रोटरी, क्लब व महिला बचत गटातर्फे
महापालिकेच्या महिला शिक्षिका आणि महिला कामगार वर्ग यांच्या साठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. प्रभाग क्र.31 मधील महिला साफसफाई कर्मचार्‍यांना मिठाई वाटप करण्यात आली नगरसेवक अंबरनाथ कांबळे, आरोग्य निरीक्षक मानमोडे, प्रविण चव्हाण, राहुल वाघमारे, मधुकर गायसमुद्रे, संदिप नितनवरे, आकाश साळवी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

जुन्या सांगवीत खाऊ वाटप
जुनी सांगवीतील आंगणवाडी क्र.52, जयमाला नगर ( एस.टी.वसाहत) माहिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांसाठी सुंदर अक्षर पाटी व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी नुतन शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्ञानदा ढाणे यांच्यातर्फे वॉटर फिल्टर भेट देण्यात आला. त्यावेळी अलका भालेराव, राजश्री पोटे यांनी संयोजन केले.

पिंपळे सौदागर येथे कै. पांडुरंग धोंडीबा माकर प्रतिष्ठान यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त क प्रभाग क्रं. 28 मधील आरोग्य विभागातील महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त ऊन व पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी आरोग्य कार्यलयात टोपी व सनकोट वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच आरोग्य सहाय्यक दीपक माकर, आरोग्य निरिक्षक राकेश सौदाई यांच्या हस्ते वाटप झाले. महिलांना कर्मचारी वर्गाने मिठाई वाटुन व केक कापुन या जागतिक महिलादिनाचा आनंद व्यक्त केला. सर्व कर्मचारी महिलांना आरोग्य विभागातील अधिकारी व कामगारांनी शुभेच्छा दिल्या.