यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सांगवी बु॥ येथील जिल्हा परिषद मुलांची शाळेचे उपशिक्षक अतुल रमेश चौधरी यांना शासनाचा २०३-२४साठीचा जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे जळगाव जिल्हा परिषदच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील प्राप्त झालेल्या २३ प्रस्तवा पैकी एकुण १५ शिक्षकांचे प्रस्तावास विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्याकडे पाठविण्यात आले असता , दिनांक ४सप्टेंबर २०२३ रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांनी मान्यता दिली असुन , अतुल रमेश चौधरी राहणार सांगवी बु॥ तालुका येथील जिल्हा परिषदच्या मुलांच्या शाळेचे उपशिक्षक यांची या जिल्हा शिक्षक पुस्कारासाठी निवड करण्यात आली असुन,या संदर्भातील माहीतीचे पत्र यावल तालुका गटशिक्षण विश्वनाथ धनके यांना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी पत्र पाठवुन ही माहिती कळविली आहे . सांगवी तालुका यावलचे रहीवासी अतुल रमेश चौधरी यांचे नांव जिल्हा पुरस्कारासाठी जाहीर झाल्याने त्यांचे विविध स्तरावर स्वागत करण्यात येत आहे . दिनांक ५ सप्टेंबर रोजी जळगाव येथील भाऊसाहेब गंधे सभागृहात होणाऱ्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे .