सांडपाणीच्या समस्येबाबत महापौरांना निवेदन

0

जळगाव । येथील तळेले कॉलनी परिसरात असलेल्या विविध समस्यांबाबत कॉलनीवासीय महिला मंडळातर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तळेले कॉलनीतील रहिवासी गेल्या वीस वर्षांपासून या भागात रहिवास करीत असून तेथे कच्च्या गटारीही नाहीत. वेळोवेळी शेकडो वेळा त्या त्या वेळेचे आयुक्त महापौर यांना भेटून निवेदन देवूनही काही उपयोग झालेला नाही. शेवटी यावेळीतरी न्याय मिळेल या आशेने परिसरातील समस्त महिला प्रतिनिधींनी एकत्रीत येवून आयुक्तांना निवेदन दिले.

तळेले कॉलनीतील समस्याग्रस्त महिला प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या अधिकारी वरिष्ठांना सर्व लवाजमा येतो. साफसफाईचे नाटक होते. परत जैसे थे। वेळोवेळी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने मनपा विविध अधिकारी व कर्मचार्‍यांना पाठविते परंतू प्रत्यक्ष कृती होत नाही. आताही आम्ही मागील पंधराविसापूर्वी महापौरांना भेटलो. महापौर व उपमहापौर आले पाहणी केली. नंतर सांगितले. की तात्पुरत्या व्यवस्था करतो. परंतु काहीच झाले नाही. त्यानंतर सर्व जैसे थे. सांडपाणी रस्त्यावर आल्याने चालणेही दुरापास्त झाले आहे. गटारी तुडुंब भरुन रस्त्यावर घाणीचे साम्राज्य आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. भूमीगत गटारीचे नुसते आश्‍वासन महापौरांनी दिले. सांडपाण्याचा निचरा नीट होणे करीता पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी प्रभात शिरसाठ, प्रतिभा महाजन, योगिता काळे, रत्ना राणे, लिना राणे, रंजना सरोदे, कल्पना पाटील, उज्ज्वला तळेले, दिपाली खडसे, हर्षाली चौधरी, छाया बोंडे, नलिनी पाटील, जयश्री धांडे, कुसुम पाटील, मीना पाचपांडे, अंजू शर्मा, कविता भोळे, मनिषा पाटील, सुवर्णा महाजन, निर्मला पाटील, सुवर्णा महाजन, निर्मला पाटील, कल्पना पाटील, कावेरी भंगाळे आदींचा समावेश होता.