सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी अधिकार्‍यांची धावपळ

0

यवत । कुरकुंभ औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सांडपाणी शुद्ध करून रोटी येथील वनविभागाच्या जागेत सोडण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याने एमआयडीसी अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे.कुरकुंभ औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सांडपाणी वर्षानुवर्षापासून कुरकुंभ परिसरातील ओढ्यातून वाहत होते. परंतु येथील ग्रामस्थांनी एमआयडीसी अधिकार्‍यांना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरल्याने हे पाणी रोटी येथील वनविभागाच्या जागेत सोडण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद असल्याने साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी अधिकार्‍यांची पळापळ सुरू झाली आहे.

सामूहिक सांडपाणी केंद्राने हे पाणी रोटी येथील पाईप लाईनमधून नेत असताना पाईप लाईनचा वॉल तुटल्याने हे पाणी पाइपलाईन गट नं 123 मधील असलेल्या शेततळ्यामध्ये सोडल्याचे शेतकरी सचिन शितोळे यांनी सांगितले. सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने कुणाला विचारून हे पाणी आमच्या शेततळ्यात सोडले आहे. या पाण्यामुळे आमच्या शेतीतील नुकसान होऊ शकते याला जबाबदार कोण, असा सवाल शितोळे यांनी उपस्थित होता.

दाब आल्याने वॉल तुटला
ही पाईपलाईन 2005 पासून बंद असल्याने पाईपलाईन आम्ही चेक करत आहे. या शेततळ्यात पाणी जाणून बुजून सोडले नसून इयर वॉलवर दाब आल्याने हा वॉल तुटला व ते पाणी येथील शेततळ्यात गेले आहे, असे सीईटीपी चालक थोरात नरशिंग यांनी सांगितले.