सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शुल्क घेणार्‍यांवर कारवाई करा

0

धुळे : सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली पालकांची पिळवणुक करणार्‍या शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सनेने जिल्हाधिकार्‍याना दिलेल्या निवेदनाता केली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये डिसेंबर अखेर व जानेवारीच्या सुरूवातीस सांस्कृतिक कार्यक्रमांचे (गॅदरींग)चे आयोजन केले जाते. यात अनेक शाळा, महाविद्यालये हे स्पर्धेंच्या युगात आपले वेगळेपण दाखविण्यासाठी मोठे कार्यक्रम तसेच विविध ‘डे‘ चे आयोजन करीत असतात. यासाठी लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांकडून आकारला जातो.

यातून पालकांची पिळवणूक होऊन त्यांना आर्थिक, मानसिक त्रास होत असतो. राईट ऑफ चिंड्रेन टू फ्री अ‍ॅन्ड कम्पलसरी एज्युकेशन अ‍ॅक्ट व कॅपीटेशन अ‍ॅक्ट 1956 नुसार शैक्षणिक संस्थांना शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमांपेक्षा जास्त शुल्क येत नाही. जर संस्था अतिरिक्त रकमा स्विकारत असतील तर त्यांना त्यांच्या पावत्या देणे बंधनकारक आहे. कुठल्याही परिस्थितीत शाळा, महाविद्यलयांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अतिरिक्त शुल्क आकारू नये. तसेच असे शुल्क आकारणार्‍यांवर कारवाईची मागणी मनसेतर्फे करण्यात आलेली आहे. या निवेदनावर जिल्हा सरचिटणीस प्रसाद देशमुख, यश शर्मा, राहुल मराठे, नितीन शर्मा, विजू जगताप, रवी शिंदे, कमलेश जडे, अभिजित सोनवणे, हर्षल परदेशी, चेतन चौधरी, गणेश जाधव आदी उपस्थित होते.