सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी उडविली धमाल

0

मांडवेदिगर । येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चिमुकल्यांनी झिंगाट कार्यक्रमासह सामाजिक प्रबोधन, दारूबंदी, मुलींचे जन्मदर वाढवा, हुंडा बळी, स्वच्छता अभियान, स्त्री भ्रूण हत्या, डिजीटल इंडिया यासारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी धमाल उडवून दिली.

उपस्थितांकडून चिमुकल्यांना दाद
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जेनाबाई पवार होत्या. प्रमुख पाहूणे म्हणून उपसरपंच किसन पवार, तसेच सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी मार्गदर्शन करतांना शिक्षक बडगुजर यांनी स्वच्छता अभियानाचा मंत्र उपस्थित ग्रामस्थांना दिला. दारूबंदीच्या गाण्यावर विशाल राठोड या चिमुकल्याने उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी मुख्याध्यापक बिराजदार, तडवी, बडगुजर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक गणेश राठोड यांनी केले. सुत्रसंचालन पोलिस पाटील रविंद्र पवार यांनी केले. तर आभार गोरलाल जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिमुकल्यांसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.