‘सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ विषयावर पेठे यांचे चर्चासत्र

0

जळगाव। परिवर्तन जळगाव व नुतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने याविषयाला घेऊन प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक व प्रयोगशील कलावंत अतुल पेठे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन 22 एप्रिल शनिवारी सकाळी 10: 30 वा नुतन मराठा महाविद्यालयाच्या जगदीशचंद्र बोस सभागृहात करण्यात आले आहे . या चर्चासत्राच्या निमित्ताने जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रापुढील आवहानांचही अवलोकन करता येईल.

समाजस्वास्थ्य या नाटकाच्या निमित्ताने अतुल पेठे महाराष्ट्रातील विविध भागांचा दौरा करीत आहे. उद्या या नाटकाचा जळगाव येथील गंधे सभागृहात प्रयोग आहे. महाराष्ट्राला सुपरिचित असणारे अतुल पेठे यांच्या सोबत चर्चा करण्याची संधी जळगावकर रसीक व रंगकर्मी यांना आहे. या कार्यक्रमाला नुतन मराठा संस्थेचे सचिव विजय बापू पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जळगावातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणार्‍या कलावांत व रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन परिवर्तनच्या वतीने पुरुषोत्तम चौधरी व नारायण बाविस्कर, मंजुषा भिड़े व हर्षल पाटील यांनी केले आहे.