साईनाथनगरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ

0

दिवसाढवळ्या केली गाड्यांची तोडफोड

निगडी : दिवसाढवळ्या 15 ते 18 जणांच्या टोळक्यांनी सशस्त्रांसह निगडी, साईनाथनगरमध्ये धुमाकूळ घातला. धारदार हत्यारांनी रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निगडीतील, साईनाथनगर परिसरात दुपारी सव्वा दोनच्या सुमारास 15 ते 18 जणांचे टोळके आले. त्यांच्याकडे धारदार हत्यारे होती. टोळक्याने अचानक रस्त्यांवरील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. वॅगनर, झायलो, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनअर, दुचाकी यासह आठ ते नऊ गाड्यांची तोडफोड केली.

दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु होऊन वाहनांच्या तोडफोडीचे सुत्र सुरुच आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्‍न उपस्थित केला जाऊ लागला आहे.