कटक । ओरिसा, कटक येथील जवाहरलाल नेहरू बंदिस्त क्रीडा संकुलात मॅटवर संपन्न झालेल्या 44 व्या राष्टीय कुमार व कुमारी या स्पर्धेत दोन्ही गटांत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) अजिंक्यपद कायम राखले. सलग दुसर्या वर्षी साईच्या दोन्ही संघांनी यशाची पुनरावृत्ती साधत आपले वर्चस्व राखले.कुमारी गटातील मुलीचा सामना भारतीय क्रीडा प्राधिकरण ( साई ) विरुद्ध हरियाणा यांच्यात झाला. या सामन्या मध्यांतराला साईकडे 24-11 अशी आघाडी होती. साईकडून सरमिससता देबाता, सरस्वती यांनी चढायामध्ये हरियाणाचे क्षेत्ररक्षण खिळखिळे केले तर आगता लकारा यांनी आकर्षक पकडी करुन हरियाणाच्या चढाई पट्टुना रोखले. हरियाणाच्या अंजली, प्रिया यांनी जोरदार चढाया करून चांगला प्रतिकार केला, तर मानसीने पकडी करुन साईच्या खेळांडूना रोखण्याचा प्रयत्न केला. शेवटी भारतीय क्रीडा प्राधिकरणाणे 36-27, असा सामना जिंकून सलग दुसर्या वर्षी राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवले.
कुमार मुलाच्या अंतिम सामण्यात भारतिय क्रीडा प्राधिकरणाने उत्तर प्रदेशवर 39-27 असा सलग तिसर्या वर्षी राष्ट्रीय अजिंक्यपद मिळविले. साईकडून क्रिष्णा, अमित हे चढाईमध्ये चमकले, तर राहुल कुमारने छान पकडी केल्या. उत्तर प्रदेशकडून अमरजित यादव, विपुल लांबा यांनी चढाईमध्ये चमक दाखवली, तर नितीन परमार यांनी पकडी केल्या. मुलीच्या उपांत्य सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राला 33-23 असे नमविले. मध्यांतराला महाराष्ट्राकडे 15-14 अशी आघाडी होती. महाराष्ट्राच्या मुलांना साईने उपांत्य फेरीत 56-27, असे सहज नमवले.