साईप्रणित, सौरभची थायलंड ग्रांपी स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत धडक

0

बँकॉक । थायलंड ग्रांप्री स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू बी.साई प्रणित व सौरभ वर्मा यांनी शानदार विजय मिळवताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला व पुरुष दुहेरीत मात्र भारतीय जोडीला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले. दुसर्‍या फेरीतील लढतीत 12 व्या मानांकित सौरभ वर्माने मायदेशी सहकारी आनंद पवारला 21-17, 20-22, 21-14 असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

साई प्रणितने मलेशियन आर.सेतीशथरनला 21-15, 21-13 असे सहज पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अन्य लढतीत मात्र पारुपल्ली कश्यपचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. युवा खेळाडू श्रेयांश जयस्वालला थायलंडच्या सुपेन्याने 21-9, 21-18 असे नमवत बाहेरचा रस्ता दाखवला. शुंभकर डेलाही मलेशियन डॅरेन लिव्हने 10-21, 21-15, 21-19 असे पराभूत केले. महिला गटात ऋत्विका गद्रेला इंडोनेशियाच्या श्री फातेमनीने 18-21, 11-21 असे पराभूत केले. याशिवाय, महिला दुहेरीत मेघना जाक्कमपुडी-पूर्वशा राम यांचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष दुहेरीत अर्जुन व रामचंद्र श्लोक या जोडीला थायलंडच्या नामदेश जोडीने 21-15, 12-21, 13-21 असे पराभूत केले.