पुणे । शिवतीर्थनगर येथील श्री गणेश मंदिरामध्ये शुक्रवारी सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी 77 वर्षांच्या श्रीकांत गोरे यांनी काढलेल्या साईबाबांच्या 30 फूट उंच 18 फूट रूंद पुष्प रांगोळीभोवती पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. रसिका सुतार यांनी त्रिपूर वात लावून उपक्रमाचे उद्घाटन केले.
या उपक्रमास शशिकांत सुतार, पृथ्वीराज सुतार यांचे सहकार्य लाभले. यावेळी व्यवस्थापक आनंदा अंबरडेकर, मधुकर शिंदे, आनंद फडके, ओमकार गेहुले, ममता गेहुले, प्रीती गेहुले, कश्मीरा लाड सहभागी झाले होते.दरवर्षी गोरे संत, देव-देवता यांची चित्रे काढतात. यंदाच्या वर्षी त्यांनी श्री साईबाबा यांची पुष्प रांगोळी काढली. ही रांगोळी अतिशय लक्षवेधक होती. महिला, नागरिक मोठ्या संख्येने या दीपोत्सवात सहभागी झाले होते.