पिंपरी- बिजलीनगर वाल्हेकरवाडी येथील साईराज मित्र मंडळाने यंदाच्या वर्षी कोजागिरी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महिला व लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या गरबा स्पर्धा खास आकर्षण ठरले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे, निगडीच्या पोलीस उपनिरीक्षक सीता वाघमारे, शिक्षातज्ञ रुपाली पाटील, प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील,संतोष चव्हाण, जितेंद्र पाटील,भागवत गायकवाड,जयसिंगराव देसाई,वसंत निकम,साईराज मित्र मंडळाचे संचालक सुनिल पाटील,रमेश पिसे यांची होती.
शिक्षणतज्ञ रुपाली पाटील म्हणाल्या साईराज मित्र मंडळाच्या महोत्सवामध्ये महिला आणि मुलींच्या कलागुणांना वाव मिळाला.एक चांगले व्यासपीठ त्यामुळे सर्वांसाठी उपलब्ध झाले. विजेत्या महिला शहरासाठी सांस्कृतिक योगदान देण्यासाठी यापुढेही कार्यरत राहतील.
पोलीस उपनिरीक्षक सीता वाघमारे म्हणाल्या,” कलागुणांनसोबतच स्वसंरक्षण करण्यासाठी सुद्धा महिलांनी आता प्रयत्नरत राहिले पाहिजे.स्वतःच्या सुरक्षेकरिता सतत दक्ष राहणे आवश्यक आहे. आजूबाजूला होणारी अन्यायकारक घटना रोखण्यासाठी पोलीस विभाग शहरात विशेष मोहीम राबवित आहे.आपण सर्वांनीच सावध तसेच जागरूक राहणे आवश्यक आहे.”
गरबा स्पर्धेमध्ये मनीषा पाटील,ललिता पाटील,योगिता शिंपी,पूनम संकपाळ या पैठणीच्या मानकरी ठरल्या. ज्योती पाटील, तेजल चौधरी, ललिता बेंडाळे, चैताली शिंपी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
वय वर्ष १२ ते १८ या मुलींच्या गटामध्ये कल्याणी चऱ्हाटे,अंजली मगदुम,प्राजक्ता कदम,प्रतीक्षा उनाळे,श्रेया जाधव,प्रणाली कोळी यांनी बाजी मारली. वय वर्ष ५ ते१२ वर्ष मुलींच्या गटामध्ये आद्या किनगे,श्रिया पाखले,मयुरी भदाणे, रागिणी सुर्यवंशी, ताई आरोही यांनी बक्षिस मिळविले.मुलांमध्ये नितीन किनगे,राज पाटील,यज्ञेश गांधेले,साईराज शिंपी,ऋग्वेद सुर्यवंशी यांना पारितोषिक देण्यात आले.
कोजागिरी सांस्कृतिक महोत्सवासाठी विशेष परिश्रम धिरज बोरा, काका वाडेकर, तात्या कुंटे, भाऊ सिद्धेश्वर, हेमंत नाईकरे, गोपाळ चौधरी, संजय यादव, नरेंद्र चऱ्हाटे, प्रशांत शिंपी, सुनिल बोरसे, सुरेश चौधरी, शैलेश पाटील, नितीन किनगे, दत्तात्रय जाधव, विनायक पाखले, रामेश्वर ईशी, श्याम देसले, बापू शिरसाठ, सहदेव शिंपी, मनोहर पाटील, प्रमोद पाटील, मयूर पाटील, चंद्रकांत पाटील, प्रशांत किनगे, अमित पाटील, अमोल आहेर, ईश्वर पाटील, सदाशिव बाविस्कर, प्रदीप भदाणे, महेश शिरसाठ, श्रीराम बागड, राहुल भोसले, संजय महाजन, समाधान सोनवणे, किरण शिंपी, हरीचंद्र गांधेले, गणेश चौधरी, स्वप्नील सावंत, दीपक पाटील, अमर देसाई, निखिल चौधरी यांनी घेतले.