साई भक्त पदयात्रा अमळनेरात दाखल

0

अमळनेर । येथील वाघ बिल्डिंग जवळील व पैलाड येथील श्री साईबाबा मंदिर भक्तांची पदयात्रे निमित्त जयघोषाने शहर दुमदुमले. पदयात्रेत उंट, घोडे, साईरथ वारीतील आकर्षण ठरले. यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी व मित्र परिवाराने अमळनेर ते शिर्डी जाणार्‍या भाविकांना भेट दिली. साईसेवा ग्रुपतर्फे निघालेल्या दिंडीला आमदार शिरीष चौधरी, उमेश साळूखे, उदय पाटील, प्रवीण पाठक, धनंजय महाजन, संजय पाटील, सुरेश पाटील, सुनील भामरे, संजय पाळधी, संतोष लोहरे, किरण सावंत, नितीन निळे, ज्ञानेश्वर पाटील, सुनील पाटील, प्रवीण सातपुते, सुनील शिंपी, विजय पाटील, डॉ राजेंद्र पिंगळे, अनिल महाजन, बाळासाहेब महाजन, अनिल मराठे, भैय्या पाटील, नरेंद्र सोनवणे, भूषण चौधरी, प्रवीण महाजन, योगेश सूर्यवंशी, राजू टेलर आदींची उपस्थिती होती.