साई संस्कार कॉलनीत चोरी

0

जळगाव। वाघनगर परिसरातील साई संस्कार कॉलनीत शुक्रवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास एका उघड्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने दोन मोबाइल आणि 300 रुपये असा एकूण 5 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. साई संस्कार नगरात चंद्रकांत अशोक पाटील (वय 33, रा नशिराबाद) यांच्या बहिणीचे घर आहे. सध्या तापमानात वाढ झाल्याने ते दरवाजा उघडा करून झोपतात.

गुरूवारी रात्रीही पाटील कुटुंबीय घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपले होते. पहाटे 4 वाजेच्या सुमारास डोक्यावर बुचडा असलेला एक चोरटा त्यांच्या घरात घुसला. त्याने घरात चार्जिंगला लावलेले दोन मोबाइल आणि 300 रुपये रोख घेऊन पळत होता. त्यावेळी पाटील यांना अचानक जाग आली. त्यांनी आरडा ओरड केली. मात्र तो पर्यंत चोरटा मोबाइल आणि पैसे घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी तपासचक्र फिरविले असता प्रदिप चौधरी गोपाल चौधरी यांना चोरट्याबाबत माहिती मिळाली असता त्या माहितीच्या आधारावर संशयित चोरटा राणा सिंग प्रकाश सिंग जुन्नी याला दुपारीच अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मोबाईल व पैसे काढून दिले आहे. याप्रकरणीचा तपास गोपाल चौधरी हे करीत आहेत. तसेच त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.