साकरी ग्रामपंचायतीत निधीचा अपहार : गटविकास अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश

0

भुसावळ- तालुक्यातील साकरी ग्रामपंचायतीत 14 व्या वित्त आयोगातील निधीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार मनोज शालिग्राम सपकाळे यांनी जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा परीषदेचे उप मुख्य कार्यकारी यांनी भुसावळ गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. एक लाखांवरील विकासकामे करताना ई टेंडरींगची पद्धत अवलंबवणे गरजेचे असताना पदाधिकार्‍यांनी एलईडी दिवे निविदा पद्धत्तीने बसवून त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला तसेच अन्य कामांमध्येही अशाच पद्धत्तीने गैरव्यवहार केल्याची तक्रार सपकाळे यांनी केली आहे.