यावल : तालुक्यातील साकळी येथील शेतकर्याने मनुदेवी तलावात आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संजय भिकाजी पाटील (35, साकळी) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. पाटील यांच्यावर विकासोचे 65 हजार रुपये कर्ज थकीत होते तर ते मंगळवारपासून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता. बुधवारी दुपारी मनुदेवी तलावात त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर चिंचोली पोलीस पाटील राकेश वासुदेव पाटील यांनी यावल पोलिसात खबर दिली. मयत शेतकर्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परीवार आहे. तपास सुनील तायडे करीत आहेत.