साकळीतून ट्रॅक्टर ट्रॉली लांबवली : शिरसाडचा आरोपी जाळ्यात

0

यावल- तालुक्यातील साकळी येथून चोरट्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली लांबवली होती. पोलिसांनी या प्रकरणी असोदा येथून संशयीतास ताब्यात घेतले आहे. बंटी उर्फ ईश्वर अमृतराव कोळी (रा.शिरसाड) असे अटकेतील आरोपीचे आहे. आत्माराम चुडामण तेली (रा.साकळी) यांच्या मालकीचे ट्रॅक्टर ट्रॉली (एम. एच.19 पी.5285) 22 जून रोजी गावातील भवानी मंदिराजवळून चोरीस गेली होती. या प्रकरणी 28 जून रोजी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा हवालदार संजीव चौधरी तपास करीत असताना त्यांनी ही ट्रॉली असोद्यात मिळून आली तर ती बंटी उर्फ ईश्वर अमृतराव कोळी (रा.शिरसाड, ता.यावल) याने चोरल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्यास अटक केली.