साकळीत घर पेटले ; दिड लाखांचे नुकसान

0
साकळी : गावातील शनीपेठ भागातील रहिवासी राजेंद्र सोनू बडगुजर यांच्या धराला रविवारी सकाळी 10 वाजता शॉर्टसर्किटने आग लागल्याने सुमारे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लावली तेव्हा सर्व सदस्य शेतात गेल्याने प्राणहानी टळली तर शेजार्‍यांना आग लक्षात येताच ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नूतनराज बडगुजर, पंकज बडगुजर, नितीन बडगुजर, सचिन नाईक आदींनी धाव घेतली. आगीत कपाटातील रोकड, दागिने तसेच कपडे व धान्य मिळून सुमारे दिड लाख रुपयांचे साहित्य जळाल्याचा पंचनामा तलाठी एम.एच.तडवी यांनी केला.