साकळीत दारूबंदी संकल्पाची गुढी

0

यावल:- मद्य सेवनाने होणारी शरीरासह संसाराची राखरांगोळी पाहता गावात दारूबंदी झाल्यास निश्‍चितच ग्रामविकास साधला जावून प्रगती होईल, असा विश्‍वास राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.गजानन महाराज धानोरेकर यांनी येथ व्यक्त केले त्यानंतर गावात दारूबंदीची संकल्प गुढी उभारण्यात आली. रविवारी साकळी शिवसेना शाखा व हितचिंतक मित्र परीवाराच्या वतीने गावदारुबंदी संकल्प गुढी पुजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नाविण्यपूर्ण गाव दारुबंदीचा संकल्प गुढीचा कार्यक्रम ग्रामदैवत भवानी मंदिराच्या आवारात घेण्यात आला.

यांची होती उपस्थिती
शिवसेनेने भगव्या कपड्याने उभारलेल्या गुढीची पुजा ग्रामपंचायत सदस्या बेबाबाई चौधरी, नीलिमा नेवे, मंगला बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य जगदीश मराठे यांच्या हस्ते संकल्पनेचे नारळ फोडण्यात आले. यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी गाव दारु बंदीची संकल्पना मांडली. शूर शिवाजीचे मावळे बनून गाव दारू मुक्त करा, असे आवाहान गजानन महाराज यांनी केले. सचिन चौधरी, युवासेना शाखाप्रमुख महेद्र चौधरी, संतोष महाजन, किशोर आप्पा चौधरी, सतीष न्हावी, अरुण भोई, ग्रामपंचायत सदस्य शेख अशफाक शेखा शौकत, सुरेश माळी, जयंत बोरसे, गौतम महाजन, जयवंत सोनार, संजय पाटील, विजय महाजन, शुभम नेवे, हर्षल बाविस्कर, वसीम खान, अय्युब खान, श्रीराम महाजन यासह असंख्य शिवसैनिक व मित्रपरीवार उपस्थित होता.