यावल– एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्याप्रकरणी साकळी येथील एकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. साकळी येथील अब्दुल मोबीन शेख मुसा या संशयीताने ’मॉ-बाप की दुवा’ या ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्याने नुमानखान युसूफखान यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याचे हे पहिले प्रकरण आहे. धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारची पोस्ट टाकल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपनिरीक्षक अशोक अहिरे म्हणाले.