पोलिसांकडून मृत्यूची सखोल चौकशी
भुसावळ- तालुक्यातील साकेगाव येथील सरला बाळू कोळी (45, रा.साकेगाव, जि.जळगाव) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसांकडून सखोलपणे या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या विवाहितेची जीभ कापण्यात आली? अशीदेखील चर्चा असून पोलिसांनी मात्र आताच काही सांगता येणार नसल्याची भूमिका घेत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच काही सांगता येईल, असे सांगितले. 13 रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास या विवाहितेस नशिराबादच्या गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले तर 15 रोजी पहाटे साडेचार वाजता तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात डॉ.श्रीकांत जाधव यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक आर.टी.धारबडे करीत आहेत.