साकेगावनजीकच्या लूट प्रकरणाची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतली माहिती
भाजीपाला करावी अँन्टीजन टेस्ट : भुसावळात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचना : बाजारपेठेची पाहणीव्यावसायीकांची
भुसावळ : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता भुसावळ शहराला अचानक भेट दिली. याप्रसंगी त्यांनी वर्दळीच्या बाजारपेठेत व्यापार्यांची भेट घेवून त्यांना कोरोना अॅन्टीजन चाचणी करण्याचे आवाहन करीत नियमांचे पालन करण्याचे आवाहरन केले तसेच भाजीपाला व्यावसायीकांची अॅन्टीजन टेस्ट करण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी त्यांनी आठवडे बाजारासह मुख्य आस्थापनांची पाहणी केली. पोलिस उपअधीक्षकांकडून त्यांनी दररोज होत असलेल्या कारवाईचा आढावा जाणून घेेतला.
भाजीपाला विक्रेत्यांची टेस्ट करण्याच्या सूचना
नागरीक व भाजीपाला विके्रत्यांचा दररोज संपर्क येत असल्याने प्रत्येक भाजीपाला विके्रत्याची अॅन्टीजन टेस्ट करावी, अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पाहणीदरम्यान केल्या. याप्रसंगी त्यांनी व्यापारी तसेच आस्थापने सुरू असलेल्या विक्रेत्यांशी संवाद साधत शासनाने दिलेल्या नवीन गाईड लाईनचे पालन करण्यासंदर्भात सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक लिलाधर कानडे उपस्थित होते.
लूट प्रकरणाची माहिती घेतली
सोमवारी सकाळी साकेगावजवळ सिनेस्टाईल झालेल्या लुटीची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी माहिती घेतली. प्रत्यक्ष साक्षीदार तसेच तक्रारदाराची त्यांनी विचारपूस करीत घटनाक्रम जाणून घेतला तसेच गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या.