भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने 52 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरूलाल भगवानसिंग बिलाला (48, रा. बोगदरा, ता.जि.खरगोन, मध्यप्रदेश) यास अटक केली असून आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडून मुद्देमाल जप्त
साकेगाव येथील बाळु वासुदेव आमोदेकर यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने घरातील चार पंखे, पाण्याची मोटार, गॅस हंडी, शेगडी व मिक्सर मिळून 52 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गुरूलाल बिलाला यास अटक केल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार वठ्ठल फुसे, हवालदार अजय माळी, हवालदार युनूस शेख, नाईक विजय पोहेकर यांनी केली.