भुसावळ- तालुक्यातील साकेगाव येथील भिलवाडी भागातील चहा व्यावसायीकाकडे चोरट्यांनी घरफोडी करीत 20 हजारांचा ऐवज लांबवला. विशेष म्हणजे चोरट्यांनी घराच्या मागच्या दरवाजाला छिद्र करून दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. या प्रकरणी नंदू जगन कोळी यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 31 रोजी मध्यरात्री ते 1 नोव्हेंबरच्या पहाटे दरम्यान चोरट्यांनी कपाटातील दहा हजारांच्या रोकडसह दहा हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले. चोरीनंतर पोलिस निरीक्षक चंद्रकांत कुंभार व उपनिरीक्षक कडेवार यांनी भेट दिली.