भुसावळ : साकेगाव येथील वाघूर रेल्वे पूल ते वाघूर पूलाच्या मध्यभागी असलेल्या नदीकाठी 12 वर्षीय बालक शनिवार, 23 रोजी पहाटे मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत बालकाची अद्यापही ओळख पटलेली नाही. 12 वर्षीय बालकाच्या हातात प्लॅस्टीक मोबाईल सापडला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तालुका पोलिसांकडून कसून तपास
10 ते 12 वर्षीय बालक हरवल्याबाबत जिल्ह्यातील ज्या-ज्या पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत त्या पोलिस ठाण्यांशी तालुका पोलिसांनी संपर्क साधला आहे शिवाय साकेगाव परीसरातही खबर्यांसह पोलिस पाटलांच्या माध्यमातून अनोळखी बालकाची ओळख पटवण्यात येत आहे.
ओळख पटत असल्यास तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका पोलिसांतर्फे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे यांनी केले आहे.