भुसावळ- तालुक्यातील साकेगाव शिवारात नाल्यातून गुळ, महू नवसागर मिश्रीत दारू गाळण्यास उपयुक्त असलेले 34 हजार रुपये किंमतीचे 800 लिटर रसायन नष्ट करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेश वैद्य व सहकार्यांनी ही कारवाई केली.