साकेत मायनेनी, युकी भांब्रीची, आगेकूच कायम

0

पुणे । एमएसएलटीए व पीएमडीटीए आयोजित चौथ्या 50000डॉलर आणि हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनीने आठव्या मानांकीत पेदजा क्रिस्टीन तर तिसर्‍या मानांकीत युकी भांब्रीने क्रोटायाच्या अ‍ॅन्ट पावीक याचा पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. जागतीक क्रमवारीत 140व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या युकी भांब्री याने पावकीकचा 6-4, 7-6(7-4)असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. हा सामना 1तास 26मिनिटे चालला. 35मिनिटे चाललेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये युकीने सुरेख सुरुवात करत तिसर्‍या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस रोखली व त्यानंतर आपली आघाडी कायम ठेवत 10व्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4असा जिंकून सामन्यात आघाडी मिळवली. दुसर्‍या सेटमध्ये पावकीकने अधिक भक्कम सुरुवात दुसर्‍या गेममध्ये युकीची सर्व्हिस रोखली व सामन्यात 3-0आघडी घेतली. पण युकीने जबरदस्त कमबॅक करत पाचव्या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत 3-3अशी बरोबरी साधली. 12व्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये युकीने आपला अनुभव व कौशल्याचा वापर करत सहाव्या, नवव्या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-6(7-4)असा जिंकून उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

भारताच्या साकेत मायनेनीने सर्बियाच्या जागतीक क्रमवारीत 216वा असणा-या आठव्या मानांकीत पेदजा क्रिस्टीन याचा 4-6, 6-2, 6-0 असा पराभवाचा धक्का देत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. जागतीक क्रमवारीत 130वा असणा-या स्पेनच्या दुस-या मानांकीत ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास याने भारताच्या सुमित नागलचा 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला, तर कझाकस्तानच्या नवव्या मानांकीत अलेक्झांडर नेदोव्हेसेव याने भारताच्या एन.श्रीराम बालाजी याचा 5-7, 6-4, 7-5 असा तीन संटमध्ये पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. दुहेरी गटात ग्रेट ब्रिटनच्या स्कॉट क्लायटोन व जॉनी ओमार या जोडीने क्रोटायाच्या इवान साबानोव व मतेजा साबानोव यांचा 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.