साक्री- शहरातील सुतार गल्ली भागातील रहिवासी व व्यवसायाने हमाल असलेल्या प्रवीण काशीनाथ अहिरे (44) यांच्या खून प्रकरणी भूषण दीपक सोनवणे यास पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील बंद असलेल्या डीसीसी बँकेजवळ गुरुवारी पहाटे प्रवीण अहिरे यांचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. प्रवीण अहिरे हे घरी असताना बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यास दीपक सोनवणे याने घरातून बोलावून बाहेर नेले होते तर दुसर्या दिवशी पहाटे त्याचा मृतदेह आढळला होता. मयताच्या उजव्या चेहर्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर मारहाण केल्याच्या खुणा आढळल्या होत्या शिवाय गुप्तांगावर तसेच छातीवरही मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी मयताच्या पत्नीने फिर्याद दिल्याने आरोपी दीपक सोनवणेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.