साक्री- जमिनीच्या मूल्यांकनासाठी 400 रुपयांची लाच मागणार्या साक्री दुय्यम निबंधक कार्यालयातील दुुय्यम निबंधक अजय सैंदाणे यांना धुळे एसीबीने बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कार्यालयातच रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोर अधिकार्यांच्या गोटात खळबळ उडाली.साक्री तालुक्यातील आंबेपूर येथील तक्रारदाराने या संदर्भात तक्रार नोंदवली होती. धुळे एसीबीचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पवन देसले व सहकार्यांनी सापळा यशस्वी केला.
वर्षभरापूर्वी झाली होती कारवाई
गतवर्षीदेखील याच कार्यालयातील अधिकारी अहिरे यांना दोन लाखांची लाच घेताना धुळे एसीबीचे निरीक्षक पवन देसले यांनी रंगेहाथ पकडले होते हेदेखील विशेष !