साक्रीत वाहतुकीचा प्रश्न गंभीर

0

साक्री : शहरातील बसस्टँड रोडवरील वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्‍या लोटगाडी धारकांना दि. 18 रोजी साक्री पोलिसांनी नोटीस बजावली होती. रहदारीस अडथळा होऊन या रस्त्यावर नेहमी वर्दळ होते. दुचाकी वाहने, लोटगाडया, फळ विक्रेते, अतिक्रमण यामुळे बस स्थानककडे ये-जा करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे साक्री पोलिसांनी या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा आणत असलेल्या फळविक्रेत्यांना उपस्थित राहुन म्हणणे ऐकून घेतल्यानंतर काय निर्णय लागेल याकडे साक्री शहरातील नागरिकांनचे लक्ष लागले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे वाहनांनवरही कारवाई करण्यात याव अशी मागणी फळविक्रेत्यांनमधून जोर धरू लागली आहे.