साक्री ग्रामीण रूग्णालय बनले अस्वच्छतेचे माहेरघर

0

साक्री (शरद चव्हाण)। ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात अस्वच्छता पसरली असून कर्मचार्‍यांचे आरोग्यधोक्यात आले आहे. ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रूग्णांसाठी वापरले जाणारे साहित्य रूग्णालयात जुन्या इमारतीमध्ये टाकून देण्यात येत आहे. याठिकाणी टाकलेल्या घाणीत सलाईन, सुई आदी साहित्य उघड्यावर फेकून देत असल्याने जवळच राहणार्‍या कर्मचार्‍यांच्यासह मुलांना घातक ठरणार आहे. ग्रामीण रूग्णालयात रूग्णांसाठी वापरल्या जाणार्‍या सुया उघड्यावर टाकले जातात. औषधी बाटल्या, हातमोजे, सिरींज यांचा उपयोग झाल्यावर ते निकामी करणे बंधनकारक असूनही योग्य ती काळजी ग्रामीण रूग्णालय प्रशासनातर्फे घेण्यात येत नसून प्रशासन उदासिन असल्याचे चित्र दिसून येत आहे.

निवासी डॉक्टरांची मागणी
ग्रामीण रूग्णालयात विविध आजारांच्या रूग्णालयांसाठी वापरल्या जाणार्‍या औषधी मुदत बाह्य झालेली असून त्याचासाठा करून ठेवण्यात येत आहे. त्यांचा आर्थिक भूर्दंड शासनास बसत आहे. रूग्णांनासाठी शासन औषधी उपलब्ध करून देत आहेत मात्र त्याचा उपयोग रूग्णांवर केला जात नाही. कागदपत्रांवर त्याच्या उपचार घेणार्‍या रूग्णांची नावे दाखविले जाते. परंतु, प्रत्यक्षात त्याचा वापर केला जात नाही. तसेच महागडी औषधे फेकली जात आहे. ग्रामीण रूग्णालयात तालुक्यातील रूग्णांसाठी औषधी शासनाकडून पुरवली जातात तर काही औषधांचा तुटवडा आहे. यामुळे रूग्णांना औषधी बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत. साक्री ग्रामीण रूग्णालयात निवासी डॉक्टर असून दोन ते तीन डॉक्टरांवर आळी पाळीने कामकाजाची जबाबदारी सोपविल जात आहे. वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात राहणे बंधनकारक असतांना डॉक्टर धुळे येथून ये-जा करत असतात.