साक्री । नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी युवराज मराठे आणि धनंजय सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याआधी स्वीकृत नगरसेवकपदी संधी मिळालेल्या विजय भोसले व प्रकाश रामोळे यांनी मुदतीत राजीनामा दिल्यानंतर या दोघांची निवड करण्यात आली. तहसिलदार संदीप भोसले व मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यांनी या निवडणूकीचे कामकाज पाहिले.
यावेळी नगरपंचायतीचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे,नगराध्यक्षा सोनल नागरे, उपनगराध्यक्ष अरविंद भोसले, माजी सभापती राजेंद्र टाटीया,नगरसेवक सुमित नागरे, अॅड.शरद भामरे,सभापती अपर्णा भोसले,रत्ना भिल, शेख नाबिसाबी शेख अकबर, गणेश सूर्यवंशी, नगरसेविका स्वाती बेडसे,वर्षा येवले, प्रेरणा वाघ,सुनीता रामोळे,अॅड. पूनम शिंदे, मंगला सोनावणे, माजी सरपंच अमित नागरे,माजी पं.स. उपसभापती नितीन बेडसे, प्रा.एल. जी.सोनवणे, भाडणे ग्रा.पं सदस्य प्रसाद देसले, प्रमोद येवले,डॉ.अनिल नांद्रे, मनोज कार्ले, हरीश भोसले, अशोकगिरी महाराज,गोटू जगताप, दीपक देवरे, दीपक गुरव,प्रमोद जाधव, राजू माळी ,निलेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. रानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला.