साक्री येथील रोगनिदान शिबिरात 271 रूग्णांची तपासणी

0

साक्री । साथीदार फाऊंडेशन साक्री जवाहर मेडिकल फाऊंडेशनचे ए.सी.पी.एम मेडिकल कॉलेज धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पांझरा कॉलनी साक्री येथे कै.लताबाई सुभाष काकूस्ते व शहीद मिलींद खैरनार यांच्या स्मृती पित्यार्थ विविध आजरावर मोफत रोगनिदान शिबिराचे उद्घाटन डॉ घनश्याम अकलाडे यांनी केलं. यावेळी विलास बिरारिस,डॉ. दिलीप चोरडिया ,कॉ सुभाष काकुस्ते,वाय. एस.पाटील,पी.टी.अहिरराव,राजेंद्र रामोळे, शिवाजी सोनवणे,महेश अहिरराव,पंकज मराठे,दिनेश सोनवणे यासह साक्री शहर तसेच परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गरजूंनीमध्ये समाधान
शिबिरातील रूग्णांनी साथीदार फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिरात गरजूंना मोफत औषधोंपचार करण्यात आल्याने गरीब व गरजू रूग्णांनी समाधान व्यक्त केले. या शिबिरात साक्री शहर तसेच परिसरातील गरजूंनी गर्दी केली होती. साथीदार फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिरात रूग्णांनी तपासणी करून घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे. यापुढेही असाच उपक्रम पुन्हा करण्याचा निर्धार फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

अल्पदरात औषधोंपचार
या शिबिरात एकूण 271 रुग्ण तपासणी व रोग निदान मोफत करण्यात आले व गरजूना औषधे मोफत देण्यात आली. ज्या रुग्णांना पुढील उपाचाराची गरज आहे अशा 74 रुग्णांसाठी जवाहर रुग्णालयात धुळे येथे राहण्याची व खाण्याची सुविधा मोफत करण्यात आली आहे. त्यांना साक्री येथून मोफत धुळे येथे पोचवण्यात येणार आहे. व्यतिरिक्त रक्ताच्या चाचण्यादेखील मोफत करण्यात येणार असून फक्त औषधांचा अत्यल्प खर्च रुग्णांना करावा लागणार आहे.

यांनी केली तपासणी
शिबिरातील रुग्णांना डॉ श्‍वेता शिंदे ,डॉ उर्मिला पाटील , कौस्तुभ ठाकूर,डॉ नरेश पटेल ,डॉ डोगरगावकर , गोकुळ राजपूतयानी तपासणी केली तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अँड राकेश काकुस्ते,इंजि रोहित ठाकरे,सागर काकुस्ते,तुषार चित्ते , डॉ चंद्रशेखर पवार,मयूर दशपुते, अँड मनोज खैरनार कन्हैया काकुस्ते, प्रमोद चौधरी,हर्षल अहिरराव, संदीप सोनवणे यांनी प्रयत्न केले.