साखरेचे दर वाढणार!

0

पुणे : व्यापार्‍यांना 500 टन साखरसाठ्याची मर्यादा होती. ही मर्यादा केंद्र सरकारने उठविली आहे. यासंदर्भातील अध्यादेश मंगळवारी जारी करण्यात आला आहे. बाजारात साखरेचे दर घटत असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे साखर उद्योग आणि व्यापार्‍यांनी स्वागत केले असले तरी यामुळे साखरेचे दर वाढणार असून ग्राहकांना त्याची झळ बसण्याची शक्यता आहे.

व्यापारी, उत्पादक खूश
साठेबाजीला आळा घालण्यासाठी तसेच दरवाढीला आळा घालण्यासाठी मागील हंगामात एप्रिल 2000पासून केंद्राने साखरसाठा मर्यादा लागू केली होती. 31 डिसेंबर रोजी या मर्यादेची मुदत संपत आहे. चालू हंगामात साखरेचे मोठे उत्पादन झत्तले असून केंद्राने साखरसाठ्यावरील मर्यादा हटविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयाने मागणी वाढून साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. साठा मर्यादा हटविण्याच्या निर्णयाने व्यापारी व उत्पादक खूश झाले असले तरी ग्राहकांना दरवाढीचा फटका बसू शकतो.