मुंबई । शहरावरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण होत असताना सरकार अजूनही जनतेच्या सुरक्षेबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. सागरी किनार्यांच्या सुरक्षेसाठी शेकडो कोटी रुपये खर्च करुन खरेदी करण्यात आणलेल्या गस्तीच्या बोटी नादुरुस्त असल्याची कबुली खुद्द गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.
मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तुकाराम ओंबळे यांना अभिवादन करण्यासाठी पाटील ओंबळे स्मृती स्थळावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या 9 वर्षाच्या काळात सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सागरी सुरक्षा आधिक कडेकोट व्हावी याकरता प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ बोटी दुरुस्त करण्यात येतील असे पाटील यांनी स्पष्ट केले.