भोसरी : बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी साडेतीन लाखांची रोकड लंपास केली. भोसरीतील संत तुकारामनगर परिसरात ही घटना उघडकीस आली. शहाजी कुंडलिक नरे (वय 48, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास नरे हे सहकुटुंब बाहेर गेले होते. दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट उचकटून त्यातील 3 लाख 53 हजार रुपायांची रोकड चोरून पोबारा केला. दुपारी दोनच्या सुमार नरे घरी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.