साडेतीन लाखाची फसवणूक

0

पुणे ।भिशी लावण्याच्या बहाण्याने महिलेची साडेतीन लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याला 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. मेश्राम यांनी दिला आहे. माधव वसंत जोशी (वय 47, रा. आनंदनगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 28 जुलै ते 7 सप्टेंबर 2016 या कालावधीत कसबा पेठ परिसरात घडली. पतसंस्था असल्याची बतावणी करून कमी व्याज दराने कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने जोशी याने फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भिशीच्या बहाण्याने देण्याचे अमिष दाखवून दरमहा 50 हजार असे 5 लाख रुपये फिर्यादींकडून घेतले. फिर्यादींना केवळ दीड लाख रुपयेच परत दिले. उर्वरित साडेतीन लाख रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.